arbaaz khan malaika arora
arbaaz khan malaika aroraTeam Lokshahi

अरबाज आणि मलायकाचा 'या' कारणामुळे झाला घटस्फोट? ती म्हणाली, पुढच्या जन्मातही खान...

काही दिवसांपासून मूव्हिंग इन विथ या शोमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. कारण त्या कार्यक्रमात तिने पर्सनल लाईफबद्दल सांगितलं आहे.

सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि त्याची पूर्व पत्नी मलायका अरोरा हे नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. मलायका बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. मलायका कायम सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. त्यामुळे तिचा आज मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. परंतु ती आता गेल्या काही दिवसांपासून मूव्हिंग इन विथ या शोमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. कारण त्या कार्यक्रमात तिने पर्सनल लाईफबद्दल सांगितलं आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट २०१७ मध्ये झाला.

मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरूवात केली. मलायका आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाचे नेमके कारण काय होते हे अजूनही कळू शकले नाही. एका मुलाखतीमध्ये अरबाज खान याला विचारण्यात आले होते की, तुम्ही कधी मलायकाला तिच्या कपड्यांवरून काही बोलले नाही का? यावर अरबाज खान म्हणाला होता, मी कधीच मलायकाला तिच्या कपड्यांवरून बोललो नाही. उलट मी तिला सपोर्ट करत होतो. असा तो म्हणाला होता.

काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मलायका अरोरा हिने सांगितले होते, मला पुढच्या जन्मातही खान कुटुंबाचीच सून बनायला नक्कीच आवडले. मलायका आणि अरबाज खान यांचा एक मुलगा देखील आहे. अरहान खान असे त्याचे नाव आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com