अर्जुन कपूरच्या 'कुत्ते'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

अर्जुन कपूरच्या 'कुत्ते'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

अर्जुन कपूर, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह अभिनित आगामी चित्रपट 'कुत्ते'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे.

अर्जुन कपूर, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह अभिनित आगामी चित्रपट 'कुत्ते'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर दर्शकांमध्ये उत्कंठा वाढली होती. अशातच, या चित्रपटाचा मनोरंजक आणि इंटेन्स ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच, डार्क ह्युमरने भरपूर असलेल्या या ट्रेलरमध्ये सात ग्रे-शेडेड पात्र पाहायला मिळणार आहेत.

आज एका स्टार-स्टडेड कार्यक्रमात 'कुत्ते' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अर्जुनचा अ‍ॅक्शन पॅक्ड अवतार पाहायला मिळत आहे. तर, मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरचीही यामध्ये झळकला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता कुत्तेची कथा गुन्हेगारी विश्वावर आधारित आहे. यामध्ये अर्जून-तब्बूसह चित्रपटात नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, राधिका मदन आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, 'कुत्ते'हा चित्रपट गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच, या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज देणार असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत. 'कुत्ते'हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com