Arti Singh
Arti SinghTeam Lokshahi

Arti Singh: 'बिग बॉस' फेम आरती सिंहने केले अप्रतिम परिवर्तन, १८ दिवसांत कमी केले एवढे वजन

'बिग बॉस' फेम आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहने तिच्या परिवर्तनाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. आरतीने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

'बिग बॉस' फेम आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहने तिच्या परिवर्तनाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. आरतीने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती इंटेंस वर्कआउट करताना दिसत आहे. तीने 18 दिवसात पाच किलो वजन कमी केले आहे. आरतीचा वजन कमी करण्याचा प्रवास पाहून चाहतेही खूप प्रभावित झाले आहेत.

आरती सिंहने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप मेहनत करताना दिसत आहे. जिममध्ये आरती भारी वजन आणि कार्डिओ करताना दिसते. आरतीने 18 दिवसांत तिचे वजन 71.21 वरून 66.84 किलोपर्यंत कमी केले आहे. आरतीचा हा बदल पाहून केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही तिची प्रशंसा करत आहेत.

तिचा व्हिडिओ शेअर करताना आरती सिंहने लिहिले की, '18 दिवस, 71.21 ते 66.84... आता गिप करणार नाही.' आरतीच्या या व्हिडिओवर कमेंट करताना रश्मी देसाईने लिहिले, 'तुझा अभिमान आहे.' याशिवाय चाहते आरतीचे कौतुक करत आहेत.

Arti Singh
Ananya Pandey : अनन्याच्या सौंदर्याचे गुपित झाले उघड.....
Lokshahi
www.lokshahi.com