आर्यनच्या फोटोशूटवर शाहरुखने केली मजेशीर कमेंट; तो टी-शर्ट...

आर्यनच्या फोटोशूटवर शाहरुखने केली मजेशीर कमेंट; तो टी-शर्ट...

आर्यन खानने एका ब्रँडसाठी केले फोटोशूट

किंग खानचा लाडका मुलगा आर्यन खान त्याच्या चाहत्यांशी संपर्क वाढवत आहे. गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणात त्याचे नाव आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मात्र, आर्यन खानला त्यात क्लीन चिट मिळाली आहे. यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने इंस्टाग्रामवरही पुनरागमन केले आहे.

आर्यन खानच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आर्यन खानने एका ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. याचाच अर्थ आर्यन खानही इंडस्ट्रीत सक्रिय झाला आहे. हा एक कपडे आणि शूज ब्रँड आहे. हे फोटो आर्यन खानने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फोटो शेअर करताना आर्यन खानने "NMD V3 मधील प्रत्येक पाऊल एक नवीन मार्ग तयार करते. तुम्ही देखील तुमचा स्वतःचा मार्ग तयार करू शकता. तुम्ही त्याचे नवीन कलेक्शन देखील खरेदी करू शकता, अशी सूचक कॅप्शन लिहीली आहे. आर्यन खानने काही तीन फोटो शेअर केले आहेत. तिन्हींमध्ये त्याची रफ अँड टफ स्टाइल पाहायला मिळते.

आर्यन खानच्या या फोटोंवर पहिली कमेंट त्याची आई गौरी खानची आहे. गौरी खानने लिहिले की, माझा मुलगा, प्रेम, प्रेम आणि खूप सारे प्रेम. त्यानंतर शाहरुख खानने देखील मुलगा आर्यन खानच्या या शूटवर कमेंट केली आहे. शाहरुख खानने लिहिले की, तू खूप छान दिसत आहेस आर्यन. आणि जसे नेहमीच म्हणतात, वडिलांमध्ये जे काही दडलेले अशते, ते दबलेले असते, त्याला पुत्र सांगतो. तर, हा राखाडी टी-शर्ट माझा आहे का, अशा मिश्कील प्रश्नही शाहरुखने विचारला आहे.

आर्यन खान लवकरच वेब सीरिजचा लेखक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. तो शाहरुखसाही स्क्रिप्टिंगच्या बाबतीतही सल्ला देतो. काही दिवसांपूर्वी आर्यन खान कतरिनाची बहीण इसाबेलसोबत स्पॉट झाला होता. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान इसाबेल कैफला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे.

Lokshahi
www.lokshahi.com