Ashi Hi Banwa Banwi
Ashi Hi Banwa BanwiTeam Lokshahi

Ashi Hi Banwa Banwi: आजही प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या 'अशी ही बनवाबनवी'ला 34 वर्ष पूर्ण

मराठी इंडस्ट्रीतील 'अशी ही बनवा बनवी' या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाला आज 34 वर्षे पूर्ण झाली.

गेली 34 वर्षे या चित्रपटाने सर्वांना पोटदुखेपर्यंत हसवले आणि आजही तसचं हसवत आहे.

हा चित्रपट त्या काळातील सर्वात सुपरहिट चित्रपट होता.

चार जवळच्या मित्रांची कहाणी, त्यांच्या स्वप्नांसाठीचा त्यांचा संघर्ष आणि राहण्याची जागा आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे.

अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि सिद्धार्थ रे यांच्या अप्रतिम अभिनय आणि ऑन पॉइंट कॉमेडीमुळे हा चित्रपट एक परिपूर्ण सदाबहार चित्रपट बनला आहे,

अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनातील हा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.

अनेक चाहते तसेच कलाकार या चित्रपटाची ३4 वर्षे साजरी करत आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com