आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2'चा नवीन 
टीझर रिलीज; रणबीर कपूरसोबत...

आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2'चा नवीन टीझर रिलीज; रणबीर कपूरसोबत...

बालाजी टेलिफिल्म्सने 'ड्रीम गर्ल 2'च्या नवीन व्हिडिओसह चाहत्यांना दिली होळीची भेट

आयुष्मान खुराना अभिनीत 'ड्रीम गर्ल 2'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र होत आहे. अलीकडेच, चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीज डेट जाहीर करत एक व्हिडिओ रिलीज केला होता. यामध्ये आयुष्मान खुराना अभिनीत पूजाची झलक पाहायला मिळाली होती. आता आणखी एक नवा व्हिडिओ प्रदर्शित करत मॅकेर्सने चाहत्यांना होळीची खास भेट दिली आहे. यामध्ये पूजाला रॉकस्टारशी संवाद साधताना पाहायला मिळेल.

बालाजी टेलिफिल्म्सच्या 'ड्रीम गर्ल 2'च्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढत आहे. चित्रपटाचा पहिला प्रमोशनल व्हिडीओ समोर आल्यापासून या चित्रपटाची बरीच चर्चा होती. आता होळीच्या निमित्ताने निर्मात्यांनी जारी केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये पूजाचे बॉलिवूडच्या रॉकस्टारसोबतचे संभाषण दाखवण्यात आले आहे, याने तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे.

नव्या व्हिडीओमध्ये, आयुष्मान खुराना याने साकारलेली पूजा आणि रॉकस्टार यांच्यातील गंमतीशीर, धमाल संवाद चित्रपटाला मजेदार आणि मनोरंजक बनवते. पूजाचा रॉकस्टारसोबतचा संवाद तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 'ड्रीम गर्ल 2'च्या व्हिडिओनी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे आणि चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण करण्याचे काम केले आहे. पठाणसोबत पूजाच्या संभाषणापासून ते अलीकडचा रॉकस्टारसोबतचा तिचा प्रत्येक व्हिडिओ अनोखा आणि रोमांचक आहे.

या चित्रपटात करम आणि पूजाची भूमिका साकारणाऱ्या आयुष्मान खुरानाने त्याच्या आधीच्या भूमिकांसह आपला अभिनय सिद्ध केला आहे आणि 'ड्रीम गर्ल 2'मधील त्याच्या अभिनयाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. एकता आर कपूर निर्मित 'ड्रीम गर्ल 2'चे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. तसेच, या सिनेमात अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, ​​विजय राज, अन्नू कपूर, सीमा पाहवा, मनोज जोशी, अभिषेक बॅनर्जी आणि मनजोत सिंग यांना पाहायला मिळणार आहे. अशातच, 'ड्रीम गर्ल 2'हा चित्रपट ७ जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com