'बिग बॉस'मध्ये मोठा ट्विस्ट, अर्चना गौतमला शोमधून बाहेर काढलं; शिव ठाकरेवर हात उलचणं  पडलं भारी
Admin

'बिग बॉस'मध्ये मोठा ट्विस्ट, अर्चना गौतमला शोमधून बाहेर काढलं; शिव ठाकरेवर हात उलचणं पडलं भारी

बिग बॉस 16 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली अर्चना गौतम हिला घरातून बाहेर काढण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.

बिग बॉस 16 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली अर्चना गौतम हिला घरातून बाहेर काढण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्चना आणि शिव ठाकरे यांच्यात भांडण झाले, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून अर्चना आणि शिव यांच्यात वाद सुरू होता. ही लढत आणि बिग बॉसचा हा मोठा निर्णय येत्या एपिसोडमध्येही दाखवण्यात येणार आहे.

शिव ठाकरेसोबत मारहाण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. बिग बॉसच्या घरात अर्चना आणि शिव यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. या भांडणादरम्यान अर्चनाने शिव ठाकरेवर हातदेखील उचलला होता. बिग बॉसने अर्चनाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एखाद्या स्पर्धकाशी मारहाण झाल्यानंतर बिग बॉसच्या घरातून त्याला काढून टाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये मधुरिमा तुलीला शोमधून काढण्यात आलं होतं. विशाल आदित्य सिंगला फ्राईंग पॅनने मारल्याने तिच्यावर ही कारवाई झाली होती.

शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेलाही शोमधून बाहेर काढण्यात आले होते. त्याने रोहित वर्माला बाटली फेकून मारली होती, पण ती शमिता शेट्टीला लागली होती. त्यानंतर त्याला बाहेरचा रास्ता दाखविण्यात आला होता.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com