Vikram Gokhale
Vikram GokhaleTeam Lokshahi

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट डॉक्टरांनी म्हणाले...

ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखलेयांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांनी अपडेट दिली आहे. सध्या विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये.

पुणे : जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक, गेल्या 15 दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत, गेल्या 24 तासांपासून त्यांची तब्येत खालावली .डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू गोखले यांचे फॅमिली फ्रेंड राजेश दामले यांची माहिती.काल बुधवार सायंकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरल्या आहेत. काही माध्यमांमधील वृत्त आणि बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर गोखले यांच्या प्रकृतीबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाली होती. 

Vikram Gokhale
Kamal Haasan : सुपरस्टार कमल हासन यांची प्रकृती खालावली;रूग्णालयात करण्यात आलं दाखल

गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.

रात्री उशीरा त्यांची तब्येत खालवली असल्याचं वृत्तही आलं. काही बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटवरून प्रसारमाध्यमांनी त्यांचे निधन झाल्याचं वृत्त दिलं. दरम्यान, सोशल मीडियावरील चर्चेनंतर अखेर कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांच्या मुलीने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.

यावर डॉक्टरांनी सांगितले की, विक्रम गोखलेंती तब्बेत चिंताजनक आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com