Uorfi Javed
Uorfi JavedTeam Lokshahi

Bigg Boss 16: 'बिग बॉस OTT'नंतर Uorfi Javed सलमान खानच्या शोचा भाग असेल का?

उर्फी जावेद 'बिग बॉस ओटीटी'मध्येही दिसली होती. मात्र, पहिल्या आठवड्यातच ती शोमधून बाहेर पडली होती.

रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 16' खूप चर्चेत आहे. आजच्या काळात हेडलाइन्स बनवणारा हा एकमेव शो आहे. या शोसाठी उर्फी जावेदचेही नाव समोर येत आहे. शोच्या निर्मात्यांनी उर्फी जावेदशी संपर्क साधला आहे. या हिट रिअ‍ॅलिटी शोचा भाग होण्यासाठी अभिनेत्री निर्मात्यांशी चर्चा करत आहे.

उर्फी जावेद 'बिग बॉस ओटीटी'मध्येही दिसली होती. मात्र, पहिल्या आठवड्यातच ती शोमधून बाहेर पडली होती. शोमधून बाहेर आल्यानंतर तिने झीशान खानवर आरोप केले. उर्फी जावेदने सांगितले की, झीशानसोबतची तिची मैत्री तिला महागात पडली. उर्फी जावेद आजकाल आपल्या फॅशन आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते.

रिपोर्ट्सनुसार, 'बिग बॉस 16' ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून टीव्हीवर प्रसारित होईल. उर्फी जावेद व्यतिरिक्त या शोसाठी जी नावे समोर येत आहेत त्यात कनिका मान, बसीर अली, सनाया इराणी, मुनव्वर फारुकी यांच्यासह अनेक नावांचा समावेश असून अद्याप कोणत्याही पक्षाकडून याला दुजोरा मिळालेला नाही.

Lokshahi
www.lokshahi.com