बॅालिवूड अभिनेत्री यामी गौतमीचा मोठा खुलासा; म्हणाली की...

बॅालिवूड अभिनेत्री यामी गौतमीचा मोठा खुलासा; म्हणाली की...

बॅालिवूड अभिनेत्री यामी गौतमीने इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय
Published by :
shweta walge

अभिनेत्री यामी गौतमने 'चांद के पार चलो' या टिव्ही मालिकेपासुन आपल्या प्रवासाला सुरूवात केली. त्या नंतर उरी द सर्जिकल स्टाइक, बाला या सिनेमात साकरलेल्या भुमिका प्रेक्षकांचा पंसतीस आल्या होत्या. खुप कमी वेळामध्ये यामीने आपल्या अभिनयाने बॅालिवूडमध्ये ओळख निर्माण केली.

मात्र, यामीच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी आली होती की, तिने बॅालिवूड सोडुन जाण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये यामीने याबद्दल सांगितले होते.

यामीने मुलाखतीमध्ये सांगितले की, बॅालिवूड इंडस्ट्री मध्ये फक्त दिखाव्याला महत्व आहे. मला फक्त बॅालीवूड मध्ये काम करायचे होते. 'बाला' चित्रपट नॅामिनेट झाला नाही हे माझ्यासाठी खूप जास्त धक्कादायक होते. या सर्व गोष्टींमुऴे मला फार निराशा जाणवली. त्यामुऴे मी असा विचार करत होते, की बस झाले सर्व आता मी यापुढे कोणताच चित्रपट करणार नाही. चित्रपट सोडून जाण्याची इच्छा होती. अनेक चित्रपटात चांगले काम करुन देखील ओळख मिळत नाही. या सर्व गोष्टीमुळे मला इंडस्ट्री सोडायची होती. अशी यामी म्हणाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com