Swara Bhaskar
Swara Bhaskar Team Lokshahi

अतिक अहमद आणि त्याच्या भावाच्या हत्येवर स्वरा भास्करची प्रतिक्रिया, ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत

माफियातून राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची काल प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

माफियातून राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची काल प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांच्यासमोर हत्या झाल्यामुळे देशात एकच खळबळ माजली आहे. यावरून अनेक मोठ्या लोकांनी देखील भाष्य केले. सोबतच या प्रकरणाबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आता या प्रकरणाबद्दल अभिनेत्री स्वरा भास्करनं देखील एक ट्वीट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

Swara Bhaskar
19 वर्षीय नंदिनी गुप्ता बनली मिस इंडिया

काय म्हणाली स्वरा भास्कर ट्वीटमध्ये?

अतिक अहमद याच्या हत्येवर बोलताना स्वरा म्हणाली की, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग असो किंवा एन्काउंटर, या साजऱ्या करण्यासारख्या गोष्टी नाहीयेत. हे राज्य नियमाविरुद्ध काम करत असल्याचे संकेत, या गोष्टी देत आहेत.  राज्याच्या एजन्सींची विश्वासार्हता संपली आहे, हे यातून सूचित होतं. कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत किंवा त्यांना सक्षम करत आहेत, हे या गोष्टी दर्शवतात. हे भक्कम प्रशासन नाही, ही अराजकता आहे. असे मत तिने मांडले आहे. त्यामुळे तिचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com