Brahmastra
BrahmastraTeam Lokshahi

'ब्रह्मास्त्र' सुपरहिट; दुसऱ्या दिवशी 'इतक्या' कोटींचा गल्ला

'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'ब्रह्मास्त्र' चांगलाच धुमाकूळ घालतो आहे.

'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 75 कोटींची कमाई केली होती. तर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 85 कोटींचा गल्ला जमा केला आहे. तर आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात 160 कोंटीची कमाई केली आहे. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे मुख्य भुमिका साकारत आहेत.

'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची निर्मिती 410 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली असून या चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीनी केली आहे. या चित्रपटासाठी अयान मुखर्जी 10 वर्ष मेहनत घेत होते.

'ब्रह्मास्त्र' चित्रपटामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्टसह अमिताभ बच्चन, नागार्जुन हे सर्व कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'केसरीया', 'देवा देवा' या गाण्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

Brahmastra
Brahmastra : तेलुगूमध्ये 'ब्रह्मास्त्र'ची कशी चालली जादू? मेकर्सच्या या युक्तीमुळे बॉयकॉट गँग ठरलीअपयशी

'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 75 कोटींचा गल्ला तर दुसऱ्या दिवशी 85 कोटींचा गल्ला जमा केला आहे. तर या चित्रपटाच्या हिंदी वर्जनने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 32 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 37 कोटींचा गल्ला जमा केला आहे. अशाप्रकारे दोन दिवसांत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने 160 कोटींची कमाई केली आहे. जगभरामध्ये 8,913 चित्रपटगृहामध्ये 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com