गौतमी पाटीलविरोधात गुन्हा दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

गौतमी पाटीलविरोधात गुन्हा दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

त्यागंणा गौतमी पाटील हिने अख्ख्या महाराष्ट्राच्या तरुणाईला वेड लावले आहे. गौतमी पाटील अनेकदा वादामुळेच जास्त चर्चेत असते.

सोलापूर : नृत्यागंणा गौतमी पाटील हिने अख्ख्या महाराष्ट्राच्या तरुणाईला वेड लावले आहे. गौतमी पाटील अनेकदा वादामुळेच जास्त चर्चेत असते. आताही गौतमी सोशल मीडियावर ट्रेंडींगवर आली आहे. यावेळी चक्क कार्यक्रमाच्या आयोजकानेच गौतमी पाटीलविरोधात तक्रार दाखल केली आहे. राजेंद्र गायकवाड असे तक्रारदाराचे नाव असून गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

तक्रारीनुसार, राजेंद्र गायकवाड यांनी 12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, गौतमी पाटील 7 वाजेऐवजी 10 वाजता स्टेजवर आली. यामुळे कार्यक्रमाची वेळ संपली आणि पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला. या कार्यक्रमासाठी ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरून अवांतर पैसे घेतले. तसेच, नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूक केल्याचेही गायकवाड यांनी म्हंटले आहे. माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी राजेंद्र गायकवाड तक्रार केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com