Chala Hawa Yeu Dya
Chala Hawa Yeu DyaTeam Lokshahi

‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याच्या फेसबुक अकाऊंट हॅक, शेअर झाल्या अश्लील पोस्ट

आता अंकुरचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची बातमी सामोर आली आहे. याबद्दल त्याने थेट सायबर पोलिसात तक्रार दाखल केली.
Published by  :
shweta walge

‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून अभिनेता अंकुर वाढवेला हा घराघरात पोहोचलेला आहे. तो सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. मात्र आता अंकुरचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची बातमी सामोर आली आहे. याबद्दल त्याने थेट सायबर पोलिसात तक्रार दाखल केली.

अंकुर वाढवेचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे समोर येत आहे. अंकुरचे फेसबुक अकाऊंट २४ डिसेंबरला हॅक झाले आहे. त्याच्या अकाऊंटवरुन अश्लील गोष्टी पोस्ट होऊ लागल्या आहेत. ही गोष्ट अंकुरच्या लक्षात येताच त्याने थेट सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. अंकुरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने सायबर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत शेअर केली आहे.

“मित्रांनो माझे फेसबुकचे पेज काही दिवसांपासून हॅक झालेले आहे. त्यावर जे पोस्ट होतंय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. बऱ्याच मित्रांनी मला कॉल व मेसेज करून याबद्दल माहिती देवून चिंता व्यक्त केली. तदसंबंधी मी आजच सायबर ला तक्रार दाखल केली आहे काळजी नसावी आणि असच पाठीशी उभे रहा धन्यवाद!” अस पोस्टमध्ये म्हणाला आहे.

तसेच त्याने “सतर्क रहा माझ्या या पेजवरून काहीही मेसेज आला तर दुर्लक्षित करा नशिबाने अजून तसे कोणाला मेसेज नाही आले. ही महिती माझ्या व तुमच्याही मित्रांपर्यंत पोहचवा”, असं आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com