City Of Dreams Season 3 Official Trailer
City Of Dreams Season 3 Official Trailer

City Of Dreams 3 : सत्तासंघर्षासाठी अंतिम लढा; 'सिटी ऑफ ड्रीम्स 3'चा ट्रेलर प्रदर्शित

सिटी ऑफ ड्रीम्स' (Citi Of Dreams 3 ) या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई : सिटी ऑफ ड्रीम्स' (Citi Of Dreams 3 ) या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Season 3 Teaser Out) नुकताच या सीरिजचा धामधुमीत टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधील खतरनाक डायलॉग चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे आहेत.

'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या टीझरमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) राज्याच्या राजकीय स्थितीविषयी बोलत असल्याचे दिसून येत आहेत. तर हा टीझर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राज्याच्या राजकारणाचा नुसता खेळ झाला आहे. प्रत्येक जण पार्टी बदलत आहे, तुमचा साहेब अजून रिटायर झाला नाही. सत्तेसाठी अंतिम लढा, मी पार्टी सोडत नाही तोडतो, असे खतरनाक डायलॉग या सीरिजच्या टीझरमध्ये बघायला मिळत आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स'चे दोन्ही सीझन चाहत्यांच्या मोठ्या पसंतीस उतरले आहेत. त्यानंतर चाहते या सीझनच्या तिसऱ्या पर्वासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. तिसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यापासून चाहते या सीझनची आतुरतेने वाट बघत आहेत. राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या या वेबसीरिजसाठी चाहते मोठे उत्सुक आहेत.

सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसीरिजमध्ये गायकवाड कुटुंबीय केंद्रस्थानी आहे. वडील आणि मुलीमधील सत्तेसाठीचा संघर्ष या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आला. या वेब सीरिजचा तिसरा सीझन या महिन्यामध्ये चाहत्यांना बघायला मिळणार आहे. या सीझनमध्ये चाहत्यांना धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे.

'या' दिवशी चाहत्यांच्या भेटीला

'सिटी ऑफ ड्रीम्स 3' 26 मेपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर चाहत्यांना बघायला मिळणार आहे. दुसऱ्या सीझनचा ज्या ठिकाणी शेवट होतो, तिथूनच तिसऱ्या सीझनची सुरुवात होणार आहे. या सीझनमध्ये अमेयराव गायकवाड परत एकदा सत्तेत येणार असल्याचे सांगितले आहे. अमेयराव गायकवाडचा अनोखा अंदाज या सीरिजमध्ये चाहत्यांना बघायला मिळणार आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित या सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), प्रिया बापट (Priya Bapat) आणि सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com