राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन; 'अमर रहे'च्या दिल्या घोषणा

राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन; 'अमर रहे'च्या दिल्या घोषणा

चाहते मोठ्या प्रमाणात होते उपस्थित

नवी दिल्ली : प्रसिध्द कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी निधन झाले. आपल्या दमदार कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांनी आपल्या चाहत्यांना रडवले. आज त्यांच्यावर राजू श्रीवास्तव यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. कॉमेडियनला निरोप देण्यासाठी अनेक चित्रपट तारे आणि राजकारणीही जवळ पोहोचले होते. तसेच, यावेळी चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित असून अमर रहे चे घोषणा देण्यात आल्या.

राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यदर्शनासाठी सुनील पाल, मधुर भांडारकर आणि उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री पोहोचले होते. सर्वांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ते रुग्णालयात दाखल होते. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीड महिन्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर होते.

राजू श्रीवास्तव पडद्यावर गजोधर भैया या नावाने प्रसिद्ध होते. 2005 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सत्रात भाग घेतल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याने 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बॉम्बे टू गोवा' (रिमेक) आणि 'आमदानी अथनी खरशा रुपैया' सारखे चित्रपट केले आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com