वादग्रस्त नृत्यांगणा गौतमी पाटीलची थेट थायलंड वारी; मिळाली चित्रपटात एन्ट्री

वादग्रस्त नृत्यांगणा गौतमी पाटीलची थेट थायलंड वारी; मिळाली चित्रपटात एन्ट्री

गौतमी पाटीलच्या 'घुंगरू' चित्रपटाचं शुटिंग थेट थायलंडमध्ये

लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य करणारी नृत्यंगणा गौतमी पाटील सातत्याने चर्चेत दिसत असते. अनेकदा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला चांगलाच फेम मिऴाला. त्यानंतर तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. गौतमीच्या या अश्लील डान्स प्रकरणावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक लावणी नृत्यांगींणींची सातत्याने गौतमी पाटीलच्या नृत्यावर बंदीची मागणी केली आहे.

परंतु त्याच वादग्रस्त नृत्यांगणा गौतमी पाटीलची आता थेट चित्रपटात एन्ट्री झाली आहे. 'घुंगरू' असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामध्ये गौतमीच्या नृत्यासह तिचा अभिनय देखील पाहता येणार आहे. तसेच या चित्रपटाचे अर्धे शुट भारतातील सोलापूर, माढा आणि हंपी येथे करण्यात आले. तर चित्रपटाचे अर्धे शुट थायलंडमध्ये होणार आहे.

या चित्रपटाचे निर्मिती आणि लेखन बाबा गायकवाड यांनी केली असुन चित्रपटात गौतमी पाटील सोबत हेच मुख्य कलाकार म्हणुन झऴकणार आहेत. यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात शीतल गीते, सुदाम केंद्रे, ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण, वैभव गोरे हे कलाकार देखील चित्रपटात भुमिका साकारणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com