Tunisha Sharma
Tunisha Sharma Team Lokshahi

तुनिशा आत्महत्या प्रकरण! न्यायालयाने शीजान खानचा जामीन अर्ज फेटाळला

आत्महत्येच्या १५ दिवस अगोदर तुनिशा शर्मा आणि शीजान खान यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते.

टीव्ही मालिका अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने काही दिवसांपूर्वी सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या आत्महत्येनंतर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर तपासत असे समोर आले होती. आत्महत्येच्या १५ दिवस अगोदर तुनिशा शर्मा आणि शीजान खान यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते. ब्रेकअप झाल्यामुळे तुनिशा ही तणावामध्ये होती आणि यामध्येच तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

तुनिशा शर्मा हिने शीजान खान याच्याच मेकअप रूममध्ये आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्याच्या अगोदर काही मिनिटे ती शीजान खान यालाच भेटली होती. त्यानतंर तुनिशाच्या आईने शीजान खानवर अनेक गंभीर आरोप केले होते. 24 डिसेंबरपासून शीजान खान हा कोठडीमध्ये आहे. सुरूवातीला तो पोलिस कोठडीमध्ये होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्यानंतर सुनावणी पार पडली. मात्र, आजही शीजान खान याला न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने शीजान खान याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com