‘पठाण’ चित्रपटातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकनीला विरोध; इंदूरमध्ये जाळले दीपिका शाहरुखचे पुतळे

‘पठाण’ चित्रपटातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकनीला विरोध; इंदूरमध्ये जाळले दीपिका शाहरुखचे पुतळे

मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात आगामी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधात आंदोलन करण्यात आलं.

मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात आगामी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. मध्य प्रदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी या चित्रपटातील गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेल्या कपड्यांवर आक्षेप घेतल्यानंतर आंदोलन करण्यात आलं.

वीर शिवाजी नावाच्या गटाने केलेल्या आंदोलनामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता शाहरुख खानचा पुतळा जाळण्यात आला.‘पठाण’ या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे.

गाण्यातील काही दृष्य योग्य नाहीत असं राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार हा चित्रपट राज्यात प्रदर्शितकरायचा कि नाही ह्याबाबत विचार केला जाईल असंही मिश्रा यांनी म्हटलं. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटात दीपिकाच्या बिकिनीच्या रंगासह गाण्याच्या बोलांवरही आक्षेप नोंदवला आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री मिश्रा यांनी दीपिकावर चित्रित करण्यात आलेले काही सीन्स बदलण्याची मागणी केली आहे. असे न केल्यास आपल्या राज्यात चित्रपट प्रदर्शित करायचा कि नाही ह्याबाबत विचार केला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com