Deepika Padukone
Deepika PadukoneTeam Lokshahi

Deepika vs Katrina: कतरिना नंतर दीपिकानेही सुरु केला स्वतःचा ब्युटी ब्रँड

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि रणवीर सिंह याची पत्नी दीपिका पदुकोणने काही नवीन सुरुवात केली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि रणवीर सिंह याची पत्नी दीपिका पदुकोणने काही नवीन सुरुवात केली आहे. दीपिका पदुकोणने नवीन सेल्फ-केअर ब्रँड सुरू केला आहे. याची माहिती दीपिकाने एक व्हिडिओ द्वारे सोशल मीडियावर दिली आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते खुपच एक्साइटेड झाले आहेत. दीपिकाने यावेळेस चित्रपट सोडून काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे.

दीपिका पदुकोणने 82°E नावाचा नवीन सेल्फ-केअर ब्रँड सुरू केला आहे. दीपिका म्हणते की ती या ब्रँडवर दोन वर्षांपासून काम करत आहे आणि त्याचा जन्म भारतातच झाला आहे. टी टू ईस्ट (82°E) च्या माध्यमातून दीपिकाचे उद्दिष्ट लोकांच्या जीवनात स्वत:ची काळजी घेण्याची सवय बनवण्याचे आहे.

Deepika Padukone
Malaika-Arjun: मलायका-अर्जुन लवकरच करणार लग्न? अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

काही काळापूर्वी कतरिनाने स्वतःचा ब्युटी ब्रँडही सुरू केला, ज्याचे नाव 'के बाय कतरिना' आहे. आता दीपिकानेही अशीच काहीशी सुरुवात केली आहे. आता कतरिना आणि दीपिकाच्या ब्रँड्समध्ये स्पर्धा होणार का हे पाहायचे आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com