देसी गर्ल "प्रियांका चोप्रा' च्या गोड बाळाची झलक.......

देसी गर्ल "प्रियांका चोप्रा' च्या गोड बाळाची झलक.......

आता नुकताच प्रियंकाने तिची गोड मुलगी 'मालती मेरी' चा एक गोंडस फोटो चाहत्यांसोबत शेअर केला, तो फोटो पाहून चाहते भाळून गेले. आता सोशल मिडियावर प्रियंकाच्या मुलीचीच चर्चा सगळीकडे होत आहे.

देसी गर्ल फेम 'प्रियंका चोप्रा' नुकतीच भारतात परतली म्हणून जबरदस्त चर्चेत होती, प्रियंका आणि पती निक जोनास त्यांच्या लव्हलाईफमुळेही सातत्याने चर्चेत असतात. आणि आता नुकताच प्रियंकाने तिची गोड मुलगी 'मालती मेरी' चा एक गोंडस फोटो चाहत्यांसोबत शेअर केला, तो फोटो पाहून चाहते भाळून गेले. आता सोशल मिडियावर प्रियंकाच्या मुलीचीच चर्चा सगळीकडे होत आहे. फोटो पाहून चाहत्यांनी कोंमेंट्सद्वारे भरगोस प्रतिसाद देऊन प्रेम दर्शवले.

प्रियंकाने सरोगसीच्या मदतीने बाळाला जन्म दिला, ती नेहमीच आपल्या चेहरा लपवून फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. आत्ता नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मेरीचे चिमुकले ओठ, चिमुकले नाक , चिमुकले हाथ दिसत आहे. नजर लागण्याजोगा हा फोटो आहे. मेरी नक्की कोणावर गेलीय, प्रियांकावर कि निकवर असे चाहते तर्क लावत आहेत. तिने फोटो पोस्ट करताना "I mean...😍🥰" असे कॅप्शन देखील दिले. प्रियांका नेहमीच असे फोटो पोस्ट करून मुलीप्रती असलेले प्रेम दर्शवत असते.

देसी गर्ल "प्रियांका चोप्रा' च्या गोड बाळाची झलक.......
Rashmika Mandanna : रश्मिकाचे पारंपरिक लूकमधील स्पेशल फोटोशूट

प्रियंकाने बॅक टू बॅक हिट देऊन प्रेक्षकांवर नेहमीच आपल्या आभिनयाची जादू चालवली, आणि आता प्रियांका 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' आणि 'सिटाडेल' या मालिकांसारख्या आगामी आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर बॉलीवूडमध्ये, ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' मध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफ सोबत काम करताना दिसणार आहे, त्याव्यतिरिक्त ती 'जी ले जरा' सोबत लवकरच 2023 च्या उन्हाळ्यातील रिलीजसाठी सज्ज आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com