देवोलिना भट्टाचार्याने गुपचूप उरकले लग्न?
टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय गोपी बहू देवोलिना भट्टाचार्य लग्नबंधनात अडकणार आहे. काल रात्री देवोलीनाने हळदी समारंभाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यानंतर तिच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. आता देवोलीनाने इन्स्टा स्टोरीवर तिचा ब्राइडल लुक शेअर केले आहेत.
देवोलीनाने नववधूच्या इन्स्टा स्टोरीवर तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. हातात बांगड्या, कलरी, कपाळावर मांगटिका, कानातले, नेकपीस, बिंदी..देवोलीना गाडीत बसली आहे. सोबत मास्कही घातला आहे. देवोलीनाने तिची मेहंदी दाखवतानाही व्हिडिओ शेअर केला आहे.

देवोलीनाला ब्राइडल लूकमध्ये पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. देवोलिना नववधू झाली आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. कारण तिच्या लग्नाची कोणतीही चर्चा नव्हती. अचानक मंगळवारी देवोलीनाचा हळदीचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर बुधवारी अभिनेत्रीने ब्राइडल लूकमधील एक फोटो शेअर केले.

यामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा आहे की देवोलीनाचा नवरा कोण आहे? देवोलिना कोणाची वधू बनली यावर सस्पेन्स कायम आहे. तर, 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील तिचा सहकलाकार विशाल सिंगसोबत ही अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. दोघांचे फोटो सतत व्हायरल होत असतात. देवोलीनाचे विशालसोबत अनेक फोटो पाहून चाहतेही त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे, असा अंदाज लावत आहेत.