देवोलीना अडकली लग्नबंधनात; नवरा कोण? गुपित अखेर उलगडले

देवोलीना अडकली लग्नबंधनात; नवरा कोण? गुपित अखेर उलगडले

देवोलिनाचे विवाह झाल्याची माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम अकाउंटवरुन दिली आहे. परंतु, तिचा नवरा कोण याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

'साथ निभाना साथिया' अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने गुपचूप लग्नगाठ बांधल्याने चांगलीच चर्चेत आली आहे. कालच देवोलीनाच्या हळदी-मेहंदीचे फोटो समोर आले होते. तर, आज तिने नववधूच्या वेशातील फोटो शेअर केले. परंतु, कोणतीही चर्चा नसताना देवोलिनाचे अचानक लग्न झाल्याने हा स्टंट होता का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, देवोलिनाचे विवाह झाल्याची माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम अकाउंटवरुन दिली आहे. परंतु, तिचा नवरा कोण याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

देवोलिना भट्टाचार्जी टेलिव्हिजनचा एक लोकप्रिय चेहरा आहे. असे नाही की याआधी कोणत्याही स्टारने गुपचूप लग्न केले नाही. पण, अशा प्रकारे कोणत्याही सेलेब्सने त्यांच्या पत्नी किंवा पतीचा चेहरा लपवलेला नाही. परंतु, देवोलीनाने तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यासह नावही गुपित ठेवले होते. अखेर नाव समोर आले असून देवोलीनाचा जोडीदार दुसरा कोणी नसून शाहनवाज शेख आहे.

देवोलिनाने यासंदर्भात इन्टाग्रामला पोस्ट केले आहे. यात तिने लिहले की, चिराग लेकर भी ढुंढती तो तुझ जैसा नहीं मिलता. तू माझ्या वेदना आणि प्रार्थनांचे उत्तर आहेस. आय लव्ह यू शोनु. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम, असे तिने कॅप्शनमध्ये लिहले आहे.

शाहनवाज शेख हा व्यवसायाने जिम ट्रेनर आहे. बिग बॉस 13 च्या दरम्यान देवोलिना भट्टाचार्जीने सांगितले होते की, ती घराबाहेर कोणाला तरी डेट करत आहे. मात्र, ती व्यक्ती कोण हे तिने सांगितले नव्हते. देवोलीना आणि शाहनवाज यांची भेट तिच्या घराजवळ असलेल्या जिममध्ये झाली. साथ निभाना साथिया शोच्या सेटवर देवोलीनाचा अपघात झाला होता. यादरम्यान शाहनवाज देवोलीनाचा आधार बनला आणि तिला पुन्हा उभे केले. शाहनवाजच्या या काळजीवाहू स्वभावाने देवोलीनाचे मन जिंकले. यानंतर दोघांनी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केले. व आज विवाहबंधनात अडकले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com