Drishyam 2 title track out
Drishyam 2 title track out Team Lokshahi

Drishyam 2 Title Track Out : सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला 'दृश्यम 2' चा टायटल ट्रॅक रिलीज...

अभिनेता अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.

मुंबई : अभिनेता अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. त्याचवेळी, चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे, जो रोमांचने भरलेला आहे. सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला हा ट्रॅक उषा उथुप आणि विजय प्रकाश यांनी गायला आहे.

Drishyam 2 title track out
आजारपणावर मात केल्यानंतर डॉ. विलास उजवणेंचं झोकात पुनरागमन; 'कुलस्वामिनी' चित्रपटात प्रमुख भूमिका!

2 आणि 3 ऑक्टोबरला काय झालंय माहिती आहे ना? विजय साळगांवकर पुन्हा येतोय त्याच्या कुटुंबासोबत,असं म्हणत या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली जात आहे. या दोन दिवसांत नक्की काय झालं होतं, याचं उत्तर आता 'दृश्यम 2' मध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे.

या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता, रजत कपूर आणि मृणाल जाधव दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 18 नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com