ekta-kapoor-and-shobha-kapoor-resign-as-heads-of-altbalaji
ekta-kapoor-and-shobha-kapoor-resign-as-heads-of-altbalaji

एकता कपूरने दिला Alt Balaji चा राजीनामा, 'हे' आहे कारण

एकताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असे लिहिले आहे की, आज अधिकृतपणे एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी ऑल्ट बालाजी कंपनीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

मुंबई : टीव्ही क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor) एन्टरटेंन्मेन्ट इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. तीने अनेक टीव्ही शो, सिरीअल्स आणि चित्रपटांची निर्मिती केली आहे. तर 2017 मध्ये एकताने तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्यासोबत वेब सीरीजची निर्मिती करण्यासाठी ऑल्ट बालाजी (Alt Balaji App) ची सुरूवात केली होती.

ekta-kapoor-and-shobha-kapoor-resign-as-heads-of-altbalaji
Kala Ghoda Art Festival : 'गेटवे ऑफ इंडिया'तून मिळतोय एक्सेसेबल इंडियाचा संदेश

मात्र आता एकता कपूरने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षक आणइ चाहत्यांना चकीत केले आहे. एकता आणि तिची आई शोभा यांनी ऑल्ट बालाजीतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता ही जबाबदारी विवेक कोका यांना देण्यात आली आहे. लोकांचं म्हणणं आहे. XXX वेब सीरीज (XXX web series controversy) मुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे.

या अॅपवर बहुतेक अडल्ट कंटेंन्ट दाखवण्यात आला होता. याच कारणामुळे एकता कपूरच्या अडचणी अनेक पटींनी वाढल्या होत्या. कंगना रणौतने या अॅपवर 'लॉकअप' शो देखील होस्ट केला होता. कदाचित त्यामुळेच या घोषणेनंतर आता त्यात काय बदल होतील याचीही काही चाहत्यांना भीती वाटू लागली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com