Shahrukh Khanteam lokshahi
मनोरंजन
शाहरुख खानची पत्नी गौरी खान विरोधात गुन्हा दाखल, प्रकरण काय ?
शाहरुख खानची पत्नी गौरी खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहरुख खानची पत्नी गौरी खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी ही तुलस्यानी कंस्ट्रक्शन अँड डेवलपर्स लिमिटेडची ब्राँड अॅम्बेसेडर आहे. मुंबईतील एका उद्योगपतीने तुलसुयानी गोल्फ व्यूचे सुशांत यांनी गोल्फ सिटी भागातील फ्लॅट इतर कोणाला तरी दिला आहे. गौरी खानसोबतच तुलस्यानी कंस्ट्रक्शन अँड डेवलपमेंट लिमिटेडचे सीएमडी अनिल कुमार आणि महेश तुलस्यानी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
किरीट जसवंत शाह नावाच्या एका व्यक्तीने यांच्या लखनऊ येथील प्रोजकेटमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. त्यानंतर या व्यक्तीने गौरी खान आणि इतर तीन व्यक्तींवर पैसे हडपल्याचा आरोप केला आहे. आयपीसी कलम ४०९ अंतर्गत गौरी खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे