Deepika Padukone | Prabhas
Deepika Padukone | PrabhasTeam Lokshahi

दीपिका-प्रभासच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

महाशिवरात्रीनिमित्त दीपिका पदुकोणने चाहत्यांना भेट देत चित्रपटाचे पोस्टर शेअर केले

नवी दिल्ली : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशातच, दीपिकाने तिच्या आगामी चित्रपटाच्या रिलीज तारखेचे पोस्टर चाहत्यांसाठी शेअर केले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दीपिका प्रभाससह पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त दीपिका पदुकोणने चाहत्यांना भेट दिली आहे. वास्तविक, दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर आगामी चित्रपट प्रोजेक्ट के चे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये तीन लोक बंदूक हातात धरलेले दिसत आहेत. यावर 12.01.24 लिहिले आहे. या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण यांच्यासह अमिताभ बच्चनही झळकणार आहेत.

या चित्रपटाची रिलीज डेट समोर येताच चाहत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले, जानेवारी २०२४ मध्ये दीपिका पदुकोणचे दोन चित्रपट. तर, दुसरीकडे, अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिच्या टॉलिवूडमधील प्रवेशाचे स्वागत केले.

दरम्यान, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन दुसऱ्यांदा एकत्र काम करताना दिसत आहेत. याचे शूटींग नुकतेच पूर्ण झाले आहे. 'प्रोजेक्ट के'चे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. 2018 च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चरित्रात्मक नाटक 'महंती'चे दिग्दर्शन करण्यासाठी नाग अश्विन प्रसिद्ध आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com