निखळ मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारा गैरी"; चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

निखळ मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारा गैरी"; चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

उत्तम स्टारकास्ट असलेला, निखळ मनोरंजनातून आदिवासींच्या समस्या मांडणारा आणि विचार करायला लावणाऱ्या 'गैरी' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

उत्तम स्टारकास्ट असलेला, निखळ मनोरंजनातून आदिवासींच्या समस्या मांडणारा आणि विचार करायला लावणाऱ्या 'गैरी' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. आदिवासी समाजातल्या डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट असलेला 'गैरी' चित्रपट १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या "गैरी" या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन पांडुरंग बाबुराव जाधव यांनी केलं आहे. गुरु ठाकूर आणि विष्णु थोरे यांनी गीतलेखन, अमितराज, मयुरेश केळकर यांचे संगीत दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वैशाली सामंत , अमितराज, मधुरा कुंभार, हृषिकेश शेलार यांनी गाणी गायली आहेत. तर पार्श्वसंगीत मयूरेश केळकर यांचं आहे. विनोद पाटील यांचं छायालेखन आहे. अभिनेता मयूरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटाचा टीजर आणि ट्रेलरमधून चित्रपटाच्या रंजक कथेचा अंदाज बांधता येतो. आदिवासींच्या समस्या मांडतानाच पुरेपूर मनोरंजन करत वास्तवाविषयी विचार करायला लावणारी कथा या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत. खुसखुशीत संवाद, उत्तम अभिनयाची मेजवानी या चित्रपटात आहे. त्यामुळेच 'गैरी' चित्रपटाविषयी आता उत्सुकता वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com