"गेट टुगेदर" चित्रपट २६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

"गेट टुगेदर" चित्रपट २६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या "गेट टुगेदर" या चित्रपटातलं रूप सजलया हे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे

पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या "गेट टुगेदर" या चित्रपटातलं रूप सजलया हे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. आर्या आंबेकर, अजय रणपिसे यांनी हे गाणं गायलं असून, हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत "गेट टुगेदर" या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे,साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात प्रियंका बर्वे, जावेद अली, शंकर महादेवन यांनी गाणी गायली आहेत. या गाण्यांना आणि नुकत्याच लाँच केलेल्या ट्रेलरला सोशल मीडियातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

पहिलं प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव "गेट टुगेदर'" हा चित्रपट नव्याने करून देतो. रोमान्स, पभावनांचा कल्लोळ या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. शाळा, कॉलेजमध्ये पहिल्या प्रेमासाठी केली मजामस्ती, त्यावेळचा अल्लडपणा, हळवेपणा पुढे पुढे या नात्याला अनेक रंग कसे येत जातात याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. रूप सजलया हे गाणंही अशाच हळूवार भावना मांडणारं आहे. उत्तम शब्द, श्रवणीय संगीत, आर्या आंबेकर, अजय रणपिसे यांचा अप्रतिम आवाज या गाण्याला लाभला आहे. त्यामुळे या गाण्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळेल यात शंका नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com