Ghar Bandook Biryaani Music Launch
Ghar Bandook Biryaani Music Launch

Ghar Banduk Biryani : दिमाखदार म्युझिक लाँचमध्ये 'आहा हेरो' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘गुन गुन’ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 'घर बंदूक बिरयानी'तील आणखी एक गाणं झळकले आहे.
Published by  :
Pankaj Prabhakar Rane

बहुप्रतीक्षित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे टीझरच इतके उत्कंठा वाढवणारे होते, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील 'गुन गुन' हे प्रेमभावना व्यक्त करणारे गीत प्रदर्शित झाले. या गाण्याला 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.

‘गुन गुन’ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 'घर बंदूक बिरयानी'तील आणखी एक गाणं झळकले आहे. नुकताच 'घर बंदूक बिरयानी'चा भव्य म्युझिक लाँच दिमाखदार सोहळा पार पडला.या जबरदस्त गाण्याला प्रवीण कुवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला असून 'घर बंदूक बिरयानी' हे टायटल सॉन्ग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे. गणेश आचार्य यांचे नृत्य दिग्दर्शन लाभलेले हे जबरदस्त गाणे सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. यावेळी दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे, नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे आकाश ठोसर, सायली पाटील, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, गीतकार वैभव देशमुख, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या चित्रपटात यांच्या स्वत: नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच नागराजसोबतच सयाजी शिंदे, आकाश ठोसर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे. दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामध्ये आता या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

‘आहा हेरो’ या गाण्याच्या प्रदर्शनासोबतच ‘घर बंदूक बिरयानी’चे मेकिंगही या वेळी दाखवण्यात आले. या म्युझिक लाँच सोहळ्यात ‘आहा हेरो’ या गाण्यावर गाण्यातील कलाकार, ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी ठेका धरला. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित हा चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com