RRR 2
RRR 2 Team Lokshahi

प्रेक्षकांसाठी गूडन्यूज; लवकरचं RRR 2 येणार भेटीला

'आरआरआर' या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 900 कोटींची कमाई केली आहे.

'आरआरआर' (RRR) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला असून या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. हा सिनेमा सिनेप्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला असून अनेकांनी या सिनमाचे कौतुक केलं. 'आरआरआर' या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 900 कोटींची कमाई केली आहे. अशातच आता सिनेप्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच 'आरआरआर' या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा या सिनेमाचे दिग्दर्शक एस एस राजामौलींनी (SS Rajamouli) केली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, या सिनेमावर काम करायला सुरुवात झाली आहे.

'आरआरआर' या सिनेमाच्या पहिल्या भागामध्ये एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारताना दिसले होते. त्यामुळे 'आरआरआर 2' या सिनेमाच्या दुसऱ्या भागात नवे चेहरे दिसणार की तेच कलाकार असणार हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

RRR 2
आरआरआर मूव्ही फक्त १ रुपयात पाहण्याची संधी

'आरआरआर 2' या सिनेमातील गाणी आणि अॅक्शन पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकत झाले आहेत. 'आरआरआर 2' हा सिनेमा पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com