ग्रॅमी पुरस्कार 2023 : भारतीय संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा पटकावला ग्रॅमी पुरस्कार; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी

ग्रॅमी पुरस्कार 2023 : भारतीय संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा पटकावला ग्रॅमी पुरस्कार; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी

65 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

65 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्यात भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. त्यांच्या अल्बमला ‘सर्वोकृष्ट इमर्सिव ऑडियो अल्बम’ या श्रेणीसाठी नामांकित करण्यात आलं होतं. भारतीय संगीतकार रिकी केज यांनी यंदा त्यांच्या ‘डिव्हाईन टाइड्स’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे.

रिकी केज यांनी ट्वीट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे. सोबतच त्यांनी प्रतिष्ठित ब्रिटीश रॉक बँड द पुलिस ड्रमर स्टीवर्ट कोपलँडसोबत आपला पुरस्कार शेअर केला आहे.संगीत क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ‘ग्रॅमी’चं नाव घेतलं जातं. हा पुरस्कार नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स ॲन्ड सायन्स या संस्थेतर्फे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार हा संगीतक्षेत्रातील सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो.

सॉंग ऑफ द इयर - बियॉन्से नॉलेस (ब्रेक माय सोल)

सर्वोत्कृष्ट पॉप सोलो - अॅडले (इजी ऑन मी)

सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक अल्बम - बियॉन्से नॉलेस (रेनायसान्स)

सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम - केन्ड्रिक लॅमर (मिस्टर मोर्ले अॅन्ड द बिग स्टेपर्स)

सर्वोत्कृष्ट संगीत अर्बना अल्बम (बॅड बनी - अन वेरानो सिन टी)

सर्वोत्कृष्ट समुह सादरीकरण - सॅम स्मिथ आणि किम पेटर्स (अनहोली)

सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम - वीले नेलसॉन - अ ब्यूटीफुल टाईम

सर्वोत्कृष्ट पॉप वोकल अल्बम - हॅरी स्टाईल (हॅरी हाऊस)

सर्वोत्कृष्ट इनसर्विव्ह अल्बम - रिकी केज (डिव्हाईन टाइड्स)

सर्वोत्कृष्ट रॅगी अल्बम - द कॉलिंग-कबाका पैयरामिड

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com