हंसिका मोटवानीच्या लग्नाचे लाईव्ह स्ट्रिमिंग ओटीटी प्लॅटफॉर्मवर?

हंसिका मोटवानीच्या लग्नाचे लाईव्ह स्ट्रिमिंग ओटीटी प्लॅटफॉर्मवर?

सोशल मीडियावर सध्या हंसिका मोटवानी आणि सोहेल खातुरिया यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.

सोशल मीडियावर सध्या हंसिका मोटवानी आणि सोहेल खातुरिया यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने एंगेजमेंटची घोषणा केली होती. सोहेलने पॅरिसमधील आयफल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोझ करताना दिसला. पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे असे म्हटले जात आहे.

माहितीनुसार, जयपूरमधील मुंडोता या ४५० वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये ते लग्न करणार आहेत. २ डिसेंबर रोजी सूफी नाईट, ३ डिसेंबर रोजी मेहंदी आणि ४ डिसेंबर रोजी लग्नसोहळा असा एकूण कार्यक्रमाचा आराखडा आहे. लग्नानंतर तेथे पोलो मॅच आणि कसिनो थीम असलेल्या आफ्टर पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे. या समारंभाला त्यांच्या परिवारातील सदस्यांसह सिनेसृष्टीतील दिग्गज हजेरी लावणार आहे. एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांच्या लग्नाचे लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा केले जाणार आहे असे म्हटले जात आहे.

याबद्दल त्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हंसिका मोटवानीचा होणारा पती सोहेल खातुरिया मुंबईचा आहे. तो एक उद्योजक असून मागील अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत आहेत. ते दोघे बिझनेस पार्टनर्सही आहेत. एकत्र काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com