राणादा- पाठकबाईंच्या लग्नाची तारीख समोर; पाहा किती दिवस शिल्लक

राणादा- पाठकबाईंच्या लग्नाची तारीख समोर; पाहा किती दिवस शिल्लक

'तुझ्या जीव रंगला' या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. या मालिकेतील जोडगोळी 'राणा-दा' आणि 'अंजलीबाई' यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केलीच.

'तुझ्या जीव रंगला' या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. या मालिकेतील जोडगोळी 'राणा-दा' आणि 'अंजलीबाई' यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केलीच, परंतु मालिकेत त्यांच्या प्रेमाची केमेस्ट्री जशी आपल्याला पाहायला मिळाली, तसेच ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले. मालिकेदरम्यान त्यांच्या प्रेमाचे सुर जुळले.मालिकेत एकत्र काम करत असताना त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली. त्यानंतर 2 मे २०२२ ला दोघांनी साखरपुडा करून प्रेक्षकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली

ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता हार्दिक जोशीच्या केळवणाचा फोटो समोर आला आहे. या फोटोतून लग्नाच्या तारखेबद्दल खुलासा झाला आहे. आता त्यांच्या चाहत्यांना हा प्रश्न पडला आहे की हे दोघं लग्न कधी करणार. नुकतंच हार्दिक जोशीच्या एका मैत्रिणीने पोस्ट केलेल्या फोटोमुळे त्या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

Admin

हार्दिकच्या एका मैत्रिणीने शनिवारी २६ नोव्हेंबरला इन्स्टाग्राम स्टेटसवर हा फोटो शेअर केला होता. यात तिने हार्दिक जोशीला टॅग केले होते. त्याबरोबरच ‘फक्त ६ दिवस शिल्लक’ असा हॅशटॅगही शेअर केला होता. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर येत्या १ किंवा २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे दोघे ज्या ठिकाणी विवाहबद्ध झाले, तिथेच हार्दिक आणि अक्षया लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राणादा- पाठकबाईंच्या लग्नाची तारीख समोर; पाहा किती दिवस शिल्लक
'तुझ्यात जीव रंगला' फेम हार्दिक, अक्षया लवकरच अडकणार लग्नबंधनात.....
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com