Akshaya Deodhar Makar Sankranti Special
Akshaya Deodhar Makar Sankranti SpecialTeam Lokshahi

मकरसंक्रांती निमित्ताने पाठकबाईंचा खास लूक पाहिलात का?

तुझ्यात जीव रंगला' फेम राणा दा म्हणजे हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठकबाई म्हणजे अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
Published by :
shamal ghanekar

'तुझ्यात जीव रंगला' फेम राणा दा म्हणजे हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठकबाई म्हणजे अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतरची अक्षयाची ही पहिलीच मकरसंक्रांत आहे. पहिल्या संक्रांतनिमित्ताने अक्षयाने सोशल मीडियावर एक व्हीडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हीडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अक्षयाने शेअर केलेला व्हीडिओ पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अक्षयाने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये ती पारंपारिक अवतारात दिसत आहे. अक्षयाने काळ्या रंगाची काठपदराची साडी परिधान केली आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी नाकात नथ आणि गळ्यात मोत्याची माळ, मंगळसूत्र घातलं आहे आणि केसात गजराही तिने माळला आहे.

Akshaya Deodhar Makar Sankranti Special
Hardik Akshaya Engaged : राणा दा आणि पाठक बाईचं पार पडला साखरपुडा

राणा दा आणि पाठकबाई म्हणजे अक्षया आणि हार्दिक 2 डिसेंबर 2022 ला लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com