Jaggu ani Juliet Movie Review
Jaggu ani Juliet Movie Review

Jaggu ani Juliet Movie Review : जग्गु आणि जुलिएट जग्गु-जुलिएटसोबतचा सुखकर प्रवास

कसा आहे अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांचा ‘जग्गू आणि ज्युलिएट’ हा चित्रपट जाणून घ्या कथा..

जग्गु आणि ज्युलिएट या चित्रपटात मैत्री, प्रेम, थोडी फिलॉसॉफी, उत्तराखंडाचं नयनरम्य सौंदर्य आणि त्यात रंगणारी प्रेम कहाणी पाहायला मिळतेय. जग्गु आणि जुलिएटचा वळणा वळणाचा, उंच भरारी घेणारा सुखकर प्रवास रंजक आहे. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटात कॉमेडी, रोमान्स, ड्रामा, भाव भावना यांचा मेळ पाहायला मिळतो.या चित्रपटातून पुन्हा एकदा अभिनेता अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी ही जोडी पाहायला मिळतेय. याआधी झोंबिवली चित्रपटात दोघं एकत्र झळकले होते. मात्र या चित्रपटातून दोघांची केमिस्ट्री छान जुळली असून ही जोडी चित्रपटाच्या कथेला योग्य वाटते. चित्रपटाच्या कथेत जग्गु आणि जुलिएट ही मुख्य पात्रे आहेत. आईविना वाढलेल्या जग्गुचे वडिल म्हणजेच त्याचे तात्या त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. जग्गु उत्तराखंडात योगा कॅम्पसाठी येतो. मात्र आपल्या वयाचं कुणी नसल्याने एकटा फिरण्याचा प्लॅन करतो.

या प्रवासात त्याची जुलिएटशी भेट होते. ही अनपेक्षित भेट एक वेगळं वळण घेऊन येते. प्रवासी असणारी जुलिएटला प्रवासात जग्गुची साथ मिळते. मात्र हा प्रवास जुलिएटच्या शर्तीनुसार सुरु होतो. या प्रवासात जग्गु कसा जुलिएटच्या प्रेमात पडतो. चार दिवसात जुलिएटला इम्प्रेस करण्यात जग्गु यशस्वी होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरतय. तर दुसरीकडे योगा कॅम्पमध्ये आलेल्या मंडळींमधील प्रत्येकाची एक कहाणी आहे. जी चित्रपटाची कथा पुढे घेऊन जाण्यात भर टाकते.जग्गुच्या भूमिकेत अभिनेता अमेय वाघने एक आगरी-कोळी मुलगा उत्तम साकारलाय. भाषेची लकब, संवादफेकीतून तो विनोदी सीन छान खुलवतोय. जग्गुच्या पात्रातील निरागसता, खरेपणा त्याने छान सादर केलाय. तर दुसरीकडे जुलिएटच्या भूमिकेत अभिनेत्री वैदेही परशुरामी लक्ष वेधून घेतेय. जुलिएटच्या भूमिकेतील पैलू तिने छान सादर केलेत. हटके लुक आणि कॉश्युम्स तिचं सौंदर्य खुलवतय.

तर उपेंद्र लिमयेने साकारलेला तात्या देखील लक्ष वेधून घेतो. तर जयवंत वाडकर, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, अविनाश नारकर, सविता मालपेकर, अंगद म्हसकर, अभिज्ञा भावे, समीर चौघुले, केयुरी शाह, सुनिल अभ्यंकर, रेणुका दफ्तरदार या कलाकारांनीही उत्तम काम केलय.महेश लिमये यांचं अप्रतिम छायांकन आणि दिग्दर्शनातून केलेलं सादरीकरण या चित्रपटाची जमेची बाजू आहे. महेश लिमये, अंबर हडप, गणेश पंडित यांची कथा-पटकथा शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे. तर अंबर हटप आणि गणेश पंडित यांनी लिहीलेले संवाद कथेला आणि पात्रांना चोख बसतात. विनोदी संवाद आणखी खुलवण्यात वाव होता असं जाणवतं. तर काही ट्विस्ट आणि सीन्स हे कथेची सलगता पुढे नेण्यात अडथळा निर्माण करतात.

या चित्रपटातील गाणी आणि संगीत प्रभावी आणि कथेला न्याय देणारं आहे. अजय-अतुल यांचं संगीत कथेला साजेसं आहे. गुरु ठाकूर, अजय-अतुल यांनी लिहीलेली गाणी छान वाटतात. जयंत जठार यांचं संकलनही कथेची सलगता कायम ठेवतं. उत्तराखंडतील सौंदर्य आणि नयनरम्य जागेत घडणारा हा प्रवास महेश लिमये यांनी कॅमेऱ्यातून सुंदर टिपलाय. हा चित्रपट जग्गु आणि जुलिएटसोबत एका वेगळ्या प्रवासात घेऊन जातं जिथे विविध भाव भावनांचा मेळ तर आहेच शिवाय भरपुर मनोरंजन करणारा हा प्रवास आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com