आमचे देवही दारू पितात; केतकी चितळे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

आमचे देवही दारू पितात; केतकी चितळे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

केतकी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना केतकीने एक व्हिडीओ शेअर केला होता.

केतकी चितळे वादग्रस्त विधानाने नेहमीच वादात असते. नुकतेच तिला फेसबुकचे अ‍ॅक्सेस परत दिले होते. अशातच, केतकी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना केतकीने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये तिला मद्यपान करताना पाहून अनेकांनी सुनावले आहे. त्यावर उत्तर देताना केतकीने वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

केतकीने नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले. तिने सोशल मीडिया अकाऊंटवर सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ती 'माफ करा, पण कधी विसरु नका.. नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा' असे बोलत आहे. सोबतच तिच्या हातात दारुचा ग्लास आहे. या व्हिडीओला तिने, मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है। असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओमध्ये केतकी मद्यपान करत असल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

एका यूजरने केतकीच्या या व्हिडीओवर वाह दीदी... लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका.. आणि आपण ढोसायचं, अशी कमेंट केली होती. त्यावर केतकीने उत्तर देताना म्हणाली की, मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. काली मातेला तर दारूचा नैवेद्य असतो. तसेच काही शंकराच्या मंदिरातही. स्वतः ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका, असे तिने म्हंटले आहे. त्यावर त्या नेटकऱ्याने 'धन्यवाद' असे उत्तर दिले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com