Kiara Advani , Siddharth Malhotra wedding
Kiara Advani , Siddharth Malhotra wedding Team Lokshahi

Kiara-Siddharth Wedding Date: कियारा आणि सिद्धार्थच लग्न होणार 'या' तारखेला​

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहेत. यातच आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोन्ही स्टार्सच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. यातच आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. वृत्तांनुसार अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीही जैसलमेर पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत.

सूत्राच्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न निश्चित झाले आहे. "सिद्धार्थ आणि कियारा 6 फेब्रुवारीला राजस्थानमधील एका राजवाड्यात शाही विवाहसोहळा पार पडला आहे. 4 आणि 5 फेब्रुवारीला त्यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स होतील, जिथे त्यांचे पाहुणे आणि कुटुंबीय प्रथा, मेहंदी, हळदी आणि संगीत समारंभ साजरे करतील.

बॉलिवूड स्टार्स कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचाही राजस्थानमधील एका राजवाड्यात शाही विवाहसोहळा पार पडला. आता या यादीत सिनेस्टार सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या नावाचाही समावेश होण्याची चर्चा आहे.

Kiara Advani , Siddharth Malhotra wedding
‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याच्या फेसबुक अकाऊंट हॅक, शेअर झाल्या अश्लील पोस्ट
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com