सजलाय सूर्यगढ पॅलेस; कियारा-सिद्धार्थ आज लग्नबंधनात अडकणार
Admin

सजलाय सूर्यगढ पॅलेस; कियारा-सिद्धार्थ आज लग्नबंधनात अडकणार

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार आहेत.

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नसोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेस फुलांनी सजवण्यात आला आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळा शाही थाटात पार पडणार आहे. या कुटुंबीय, जवळचे मित्रमंडळी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला 100 ते 150 मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. ईशा अंबानी, कबीर सिंह, शाहिद कपूर, मीरा राजपूत, करण जौहर, मनीष मल्होत्रा आणि जूही चावला असे अनेक सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नातदेखील 'नो फोन पॉलिसी'चा अवलंब करण्यात आला आहे. कुटुंबीय, पाहुणे, मित्रमंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्यासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनादेखील लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची विनंती करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com