केएल राहुल-अथिया शेट्टी आज लग्नबंधनात अडकणार; जाणून घ्या किती वाजता घेणार 'सात फेरे'
Admin

केएल राहुल-अथिया शेट्टी आज लग्नबंधनात अडकणार; जाणून घ्या किती वाजता घेणार 'सात फेरे'

23 जानेवारीला आज अथिया आणि क्रिकेटर केएल राहुल सात फेरे घेणार आहेत.

23 जानेवारीला आज अथिया आणि क्रिकेटर केएल राहुल सात फेरे घेणार आहेत. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्महाऊसवर सध्या लग्नसोहळ्याला जोरात सुरूवात झाली आहे. या जोडप्याचा संगीत सोहळाही नेत्रदीपक होता.

अथिया आणि केएल राहुल सोमवारी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न करणार आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत हे जोडपे लग्न करणार आहेत. 'तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. उद्या मी मुलांना घेऊन येईन तुम्हा लोकांना भेटायला. अशाप्रकारे खुद्द सुनील शेट्टीनेच पुष्टी केली आहे की उद्या म्हणजेच 23 जानेवारीला केएल राहुल आणि अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकणार आहेत. असे त्यांनी सांगितले. या कपलच्या लग्नानंतर मुंबईत भव्य रिसेप्शन देण्यात येणार आहे, ज्यामध्ये मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. या पार्टीला तीन हजार पाहुण्यांची उपस्थिती असेल.

केएल राहुल आणि अथिया गेल्या चार वर्षांपासून डेट करत आहेत आणि टीम इंडियाच्या काही दौऱ्यांमध्ये अभिनेत्रीला अनेक वेळा क्रिकेटरसोबत पाहिले गेले होते. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा हळदी आणि मेहेंदी समारंभ आज फार्महाऊसवर होणार आहे. यासाठी फार्महाऊस फुलांनी सजवण्यात आले आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत सात फेरे घेतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com