Lata Deenanath Mangeshkar Award 2023 : आशा भोसले यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'
Admin

Lata Deenanath Mangeshkar Award 2023 : आशा भोसले यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'

आशा भोसले यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.
Published on

आशा भोसले यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

अभिनयक्षेत्रातल्या योगदानासाठी विद्या बालन आणि प्रसाद ओक यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर भारतीय संगीतातल्या योगदानासाठी पंकज उधास यांना हा पुरस्कार देण्यात आला.

गेल्या 33 वर्षांपासून नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com