प्रेम, लग्न, घटस्फोट; अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याविषयी माहिती आहे का?

प्रेम, लग्न, घटस्फोट; अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याविषयी माहिती आहे का?

छोट्या पडद्यावर लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेमधून घराघरात पोहचलेली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

छोट्या पडद्यावर लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेमधून घराघरात पोहचलेली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सध्या अपूर्वा ही बिग बॉस मराठी मध्ये दिसत आहे. बिग बॉस या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे.

अपूर्वा नेमळेकर बिग बॉसमध्ये अनेकदा तिच्या सिंगल असण्याबद्दल बोलली आहे. आभास हा’ ही पहिली मालिका होते. त्याबरोबर ‘ती एका पेक्षा एक जोडीचा मामला’ यामध्येही झळकली होती. तिची ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली.

मात्र अपूर्वा नेमळेकरचे याआधी लग्न झालेले आहे. तिचा प्रेमविवाह झाला होता. मात्र काही महिन्यांनी त्यांचा घटस्फोट झाला.अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे नाव रोहन देशपांडे असे होते. त्यांचा विवाह २०१४ मध्ये पार पडला होता. ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. अपूर्वा नेमळेकर आणि रोहन देशपांडे हे ८ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते लग्नबंधनात अडकले होते. मात्र त्यांच्यातील वादामुळे त्यांचा घटस्फोट झाला. तिच्या रिलेशनशिपबद्दल अनेकदा चर्चा सुरु असते. पण तिने त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com