महाराष्ट्राची 'हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्राची 'हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

प्रभाकर मोरे यांची कोकण विभाग अध्यक्षपदी निवड

सिनेअभिनेते आणि महाराष्ट्राची हास्यजत्राफेम प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांना सांस्कृतिक विभागाचे कोकण विभाग अध्यक्षपदी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुणे फिल्मफेस्टीवलमध्ये निवड झालेले 'मदार' सिनेमाचे निर्माते मच्छिंद्र धुमाळ यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

महाराष्ट्राची 'हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
...त्यामुळे किरीट सोमय्यांना नाक घासायला लागेल; अनिल परब आक्रमक

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तेच काम आज पवारसाहेब करत आहेत. कलावंतांसोबत पवारसाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. प्रभाकर मोरे हे कोकणातील चिपळूणचे आहेत. त्यांचे पक्षात स्वागत अजित पवार यांनी केले.

पक्षाच्या सांस्कृतिक कोकण विभागाची अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे ती जबाबदारी ते समर्थपणे पेलतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, माजी खासदार ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com