Sunil Holkar Passes AwayTeam Lokshahi
मनोरंजन
अभिनेते सुनील होळकर यांचे निधन, वयाच्या ४० व्या वर्षी अखेरचा श्वास
राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटात त्यांनी अखेरचे काम केले होते.
हिंदी आणि मराठी मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते सुनील होळकर यांचे आज निधन झाले. त्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेसह त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटात त्यांनी अखेरचे काम केले होते.
मागील काही काळापासून सुनिल हे लिव्हर सोरायसिस या आजाराने त्रस्त होते. यावर उपचारही सुरू होते. पण अखेर उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण हिंदी, मराठी चित्रपट श्रुष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. १२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केली.