Milind Soman, PM Narendra Modi
Milind Soman, PM Narendra Modi Team Lokshahi

Milind Somanने घेतली PM Narendra Modi यांची भेट

बॉलीवूडचा प्रसिद्ध कलाकार आणि मॉडेल मिलिंद सोमण हा देशातील टॉप अ‍ॅथलीट्सपैकी एक आहेत. आपल्या फिटनेसमुळे चर्चेचा विषय बनलेल्या मिलिंद सोमणने सध्या युनिटी रन पूर्ण केली आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध कलाकार आणि मॉडेल मिलिंद सोमण हा देशातील टॉप अ‍ॅथलीट्सपैकी एक आहेत. आपल्या फिटनेसमुळे चर्चेचा विषय बनलेल्या मिलिंद सोमणने सध्या युनिटी रन पूर्ण केली आहे. मिलिंद सोमणने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बुधवारी मिलिंदने दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयातून पंतप्रधानांसोबतचा स्वतःचा फोटो शेअर केला.

मिलिंदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मिलिंद सोमण पीएम मोदींसोबत उभा असल्याचा दिसत आहे. यासोबतच या फोटोच्या कॅप्शनमध्ये मिलिंद सोमणने लिहिले आहे की- " युनिटी रन नतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे हा खूप आनंदाचा क्षण आहे. या भेटीदरम्यान त्यांच्याशी बोलल्यानंतर मला ते आपलेसे वाटले. भारतीयांप्रमाणेच इतिहास, खेळ, आरोग्य आणि फिटनेसमध्ये खूप रस आहे. भारतात योग आणि आयुर्वेदाच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो."

मिलिंद सोमणचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मिलिंदच्या या फोटोला चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. मिलिंद सोमण वयाच्या 56 व्या वर्षीही तंदुरुस्त असल्याची माहिती आहे. याचे कारण म्हणजे मिलिंद रोज योगा आणि वर्कआउट करतो. इतकेच नाही तर मिलिंद सोमण हा देशातील तरुणांसाठी प्रेरणास्रोत मानला जातो.

Milind Soman, PM Narendra Modi
Dia Mirzaने कठीण गरोदरपणाचा केला खुलासा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com