abhijit bichukale wife
abhijit bichukale wifeTeam Lokshahi

माझी पत्नी पहिली महिला मुख्यमंत्री बनणार; अभिजित बिचुकलेंचे विधान

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण यावर अभिजीत यांनी भाष्य केले

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मध्यतंरीच्या काळामध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्र्यांची चर्चा रंगली होती. यामध्ये पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे समोर आली होती. आता मात्र महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण यावर अभिजीत यांनी भाष्य केले आहे. आता त्यांनी स्वतःच्या होम मिनीस्टरलाच राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा चंग बांधला आहे.

abhijit bichukale wife
बरं झालं गुवाहटीला गेलो, उद्धव ठाकरे तर...; बच्चू कडूंचा टोला

अभिजित बिचुकले यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला आहे. त्यानिमित्त त्यांनी आपल्या पत्नी अलंकृता बिचुकले यांना जाहीर पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. या पत्राचे शीर्षक महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री, असे होते. ते पुढे म्हणाले, हे मी प्रथम बोललेलो नाही. ज्यावेळी माझ्या पत्नीने २००९ मध्ये उदयनराजे यांच्या विरोधात पहिली लोकसभा निवडणूक लढवली. तेव्हाच साताऱ्याच्या पत्रकार परिषदेत मी हे बोललो आहे. शिवाय स्वातंत्र्य मिळाल्यापासून या क्षेत्रात कायम पुरुषांचीच मक्तेदारी राहिली आहे.

मुख्यमंत्रीपदी जी महिला पाहिजे तिला भारतीय संस्कृतीचं संपूर्ण ज्ञान पाहिजे. संपूर्ण भारतात ती संस्कृती जपणारी आणि पाळणारी घरंदाज स्त्री पाहिजे आणि माझी पत्नी अलंकृता बिचुकले ही महाराष्ट्राचं सौंदर्य, संस्कृती आणि मानसन्मान जपणारी स्त्री आहे. मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाताना हा मुद्दा मांडणार आहे. शिवाय आत्तापर्यंत बऱ्याच नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं आहे. सध्या महाराष्ट्राला माझ्याशिवाय पर्याय नाही, असेही बिचकुलेंनी म्हंटले आहे.

abhijit bichukale wife
अविश्वास ठराव म्हणजे फुसकी बॉम्ब; बावनकुळेंची टीका

दरम्यान, अभिजीत बिचुकले यांनी लुकतेच शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील लूकबद्दल वक्तव्य केले होते. पठाणमध्ये शाहरुख खानने माझ्यासारखा लूक केला आहे, असं विधान त्यांनी केलं होतं यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com