बंगाली साडीत निरागस लूक; मायराच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

बंगाली साडीत निरागस लूक; मायराच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली मायरा वायकुळे आता चाहत्यांसमोर नव्या स्वरुपात येणार आहे.

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली मायरा वायकुळे आता चाहत्यांसमोर नव्या स्वरुपात येणार आहे. मराठीनंतर मायरा आता हिंदी प्रेक्षकांवरही तिच्या निरागसतेची जादू चालविणार आहे. नीरजा- एक नई पहचान असं या तिच्या नवीन मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमो आता रिलीज झाला आहे. यात मायराचा बंगाली अवतार दिसत आहे. या मालिकेत मायरा नीरजाच्या भूमिकेत झळकली आहे.

मायरा कालीमातेची आरती करीत असून एक व्यक्ती तिच्यावर नजर ठेवत असल्याचे तिच्या लक्षात येते. आणि ती एक ते दहा अंक म्हणते. व ती तिथून पळ काढून थेट घरी जाते. तिथे मायरा एका बाईला म्हणते, माझ्या आईने मला सांगितलं की, एक ते दहा अंक पूर्ण होईपर्यंत जर एखादी व्यक्ती आपल्याकडे बघत असेल तर तिथून पळून जायचं. त्यावर ती बाई मायराला म्हणते, आमची नीरजा आहेच इतकी सुंदर तर लोक तिच्याकडे बघणारच. इतक्यात तिची आई येते आणि तिला घेऊन जाते. मायराला कोणत्याही प्रसंगांना तोंड द्यावे लागू नये म्हणून ती तिचे केस कापते, असे प्रोमोत दाखवले आहे.

मायराच्या या नव्य कोऱ्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून युजर्स तिचे कौतुक करत आहेत. मायराची नीरजा- एक नई पहचान मालिका लवकरच कलर्स व जिओ टीव्हीवर सुरू होणार आहे. या मालिकेची चाहते वाट पाहत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com