Admin
मनोरंजन
Uttara Baokar Passed Away : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन झाले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'द बर्निंग सीझन',' दोघी', ठक्षक, 'सरदारी बेगम, उत्तरायण','रुक्मावती की हवेली' यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासू त्या दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 'एक दिन अचानक' या सिनेमासाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री' या कॅटेगरीमधील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
'जस्सी जैसी कोई नहीं', 'जब लव हुआ', उडान, कशमकश जिंदकी की, अशा अनेक मालिकांमध्ये देखिल त्यांनी काम केले होते.