'Haddi' Movie
'Haddi' Movie Team Lokshahi

'नवाजुद्दीन सिद्दीकी' यांनी शेअर केला 'हड्डी' या चित्रपटासंबंधी आपला अनोखा अनुभव

नवाजुद्दीन सिद्दीकी यांना नव्या व्यक्तिरेखेत पाहिल्यानंतर आता नवाजुद्दीन काश्याप्रकारे धुमाकूळ घालणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. आपल्या दमदार पात्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेला नवाजुद्दीन सिद्दीकी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करण्यासाठी सज्ज झाला आहे.

मागील काही दिवसांपासून 'हड्डी' या आगामी चित्रपटाची चर्चा सगळीकडेच होत आहे. इतक्यातच आता या चित्रपटाचा नवीन पोस्टर सगळीकडे वायरल होतोय. यात 'नवाजुद्दीन सिद्दीकी' चा नवीन हटके लुक पाहायला मिळतोय. यात नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा ट्रान्सजेंडर लुक पाहायला मिळतोय. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत असा खुलासा केला की त्यांचा ट्रान्सजेंडर या पात्राच्या तयारीसाठी त्याने ट्रान्सजेंडर लोकांसोबत राहून त्यांचे जीवन अनुभवायचा निर्णय घेतला. ते म्हणाले की ''ते त्यांच्यापैकी 20-25 जणांसोबत कार्यरत आहेत, आणि हड्डीच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्या जिवानशैलीबद्दल, राहणीमानाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली, शिवाय त्यांच्या आयुष्यातील प्रश्नही समजले''. नवाजुद्दीन सिद्दीकी यांना नव्या व्यक्तिरेखेत पाहिल्यानंतर आता नवाजुद्दीन काश्याप्रकारे धुमाकूळ घालणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. आपल्या दमदार पात्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेला नवाजुद्दीन सिद्दीकी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अक्षत अजय शर्मा यांनी 'हड्डी' या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, आणि अदम्य भल्ला यांनी सहलेखन केले आहे. 2030 मध्ये या आगामी चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. चाहते या चित्रपटाची फारच आतुरतेने प्रतीक्षा करताना दिसून येतायत. यापूर्वी जेव्हा हड्डीचा फर्स्ट लूक फोटो वायरल झाला तेव्हा अनेकांना असे वाटले होते की नवाजुद्दीन अभिनेत्री हे अर्चना पूरण सिंगसारखे हुबेहूब दिसतायत.

'Haddi' Movie
First Transgender Cafe : मुंबईतील वर्सोवात उघडला तृतीयपंथींचा कॅफे

'हड्डी'या चित्रपटाच्या प्रदर्शनाधीच चाहत्यांची आतुरता शिगेला पोहोचली असे दिसून आले. 'हड्डी'मधील ट्रान्सजेंडर च्या भूमिकेबद्दल बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकी एका मुलाखतीत असे म्हणाले कि, “मी 'हड्डी'मध्ये अनेक ट्रान्स लोकांसोबत काम करत आहे. मी त्यांच्यापैकी 20-25 जणांसह वातावरणात होतो. त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपने वेगळा आहे. तो अनुभव खरच खूप मनोरंजक होता. या अनुभवावरून मला खूप काही शिकायला सुद्धा मिळाले.” नवाजुद्दीन पुढे असेही म्हणाले कि, “माझे पात्र व्यंगचित्रासारखे दिसावे असे मला वाटत नाही. नुसते पात्र सकरण्यापेक्षा मला माझ्या हाडातले पात्र अनुभवायला नक्कीच आवडेल. आणि म्हणूनच मी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.आणि अखेरीस ते पात्र कसे आकार घेते हे पाहण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे.” या आधी सुद्धा अनेक भूमिका करून नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, आणि यापुढे सुद्धा आपल्या अभिनयाच्या जादुने ते चाहत्यांची माने जिंकत राहतील.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com