हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक…’या’ अभिनेत्याला ओळखलंत का?
Admin

हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक…’या’ अभिनेत्याला ओळखलंत का?

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी 'हड्डी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी 'हड्डी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. होय, नवाजुद्दीन सिद्दीकीने अलीकडेच त्याच्या आगामी 'हड्डी' चित्रपटाची घोषणा केली ज्यामध्ये तो एका ट्रान्सजेंडर महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याने यापूर्वी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता, जो पाहिल्यानंतर चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या फोटोमध्ये नवाजुद्दीन स्त्री पात्राच्या वेशात दिसत आहे. या फोटोत नवाझुद्दीनने हिरव्या साडी नेसलेली असून कपाळावर लाल टिकली, भडक रंगाची लिपस्टिक, गळ्यात मोत्यांची लांब माळ, नाकात चमकी घातली आहे. हा फोटो पाहून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. आता या चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीचा आणखी एक लूक समोर आला आहे. जे पाहिल्यानंतर चाहत्यांना धक्काच बसला. यामध्ये अभिनेता पारंपारिक लूकमध्ये साडी परिधान करताना दिसला. त्याच्या कारकिर्दीतील हा कदाचित पहिलाच चित्रपट आहे ज्यात तो एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी हा चित्रपट अक्षत अजय शर्माने याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा ट्रान्सजेंडरच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. सध्या तरी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला नाही. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. पुढील वर्षी 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com